श्वेतपत्रिकेत 57 कोटींचा उल्लेखच नाही?

July 11, 2013 9:22 PM5 commentsViews: 1413

Image img_222852_sinchan44_240x180.jpgआशिष जाधव, मुंबई

10 जुलै : संपूर्ण महाराष्ट्राचं तोंडच पाणी पळवणार्‍या सिंचन घोटाळ्यात आणखी बरचं काही दडलंय. सरकारी तिजोरीतल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याच्या अनेक बातम्या आपण आजपर्यंत पाहिल्या. पण आता सिंचन घोटाळ्यात 57  कोटी रूपये दाखवण्यात आले नाही अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारबरोबरच जागतिक बँकेनेही राज्यातल्या धरणांच्या बांधकामांसाठी कोट्यवधी रुपये दिले होते. या रुपयांच्या वापरातही गैरव्यवहार झाल्याचे पुरावे आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहेत.

राज्यभर सिंचनाचे पाट वाहावेत, म्हणून आघाडी सरकारने गेल्या 9 वर्षांत हजारो कोटी रुपये खर्ची घातले. पण पाण्यासारखा पैसा जाऊनही सिंचन मात्र 1 टक्क्यानेही वाढलं नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यानंतर जससंपदा खात्याने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. पण त्यातही सिंचनावरील खर्चाचा हिशेब मांडताना गोंधळ घातला गेला. पण आयबीएन लोकमतच्या हाती आलेल्या नव्या माहितीनुसार.. या श्वेतपत्रिकेत जागतिक बँकेनं दिलेल्या अर्थसहाय्याचा हिशेब लपवलाय. नंतर राज्य सरकारला मुंबई हायकोर्टात सादर केलेल्या सुधारित प्रतिज्ञापत्रात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याची माहिती द्यावी लागली. पण त्यातून जागतिक बँकेनं दिलेल्या पैशातही 57 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची बाब उघड झालीय.

राज्य सरकारला 2005 ते 2012 या सात वर्षांच्या काळात जागतिक बँकेकडून सिंचन प्रकल्पांना 1 हजार 316 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं. यापैकी 57 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका राज्याच्या अकाँऊंटस् ऑफिसरच्या अहवालात ठेवण्यात आला. पण भू-संपादन आणि प्रकल्पांच्या पुनर्वसनात मोठा खर्च झाल्याचं सांगून जलसंपदा मंत्री वेळ मारून नेण्याचा पयत्न वारंवार करत आहे.

बोगस बिलं आणि व्हाउचर्स .. तसंच अव्यवहार्य खर्च झाल्यामुळे सिंचनावरचा खर्च फुगला, असं मत कॅगनं आधीच नोंदवलंय. कागदोपत्री पुराव्यानिशी घोटाळा सिद्धही होतंय. पण राज्य सरकार मात्र सर्व काही आलबेल असल्याचाच आव आणतंय.

 • Test

  IBN Lokmat congress che ghotale ka baher kadhat nahi??

  IBN Lokmat congress chya talawar nachate ka?

 • AVINASH

  Rastravadi tar sabhya nahi ahe pan Kharach ha congress cha channel ahe

 • Malhar Takle

  Janun bujun Ajit Pawar yanna badnam karnyacha prayatna kela jatoy..hyachat tyancha kahich sambandh nahiye…he sagla Engineers ani IAS baghat astat mantri nahi..

 • AVINASH

  mhanje saccha patrakarikechi 5 varsha biggest joke of ibn lokmat

 • vikas

  rajendra darda kolsa madhe kiti paise khale te ibn lokmat la mahit nahi ka soniyachi supari ghevun rastravadila badnam karyche dhande band kara

close