जातीय सभांना हायकोर्टाने घातली बंदी

July 11, 2013 9:49 PM0 commentsViews: 244

sabha343411 जुलै : जातीच्या आधारावर राजकारणाला चाप लावण्यासाठी अलाहाबाद हायकोर्टाने एक ऐतिहासिक पाऊल उचललंय. जातीय सभा घेण्यावर अलाहाबाद हायकोर्टाने आज बंदी घातली आहे. याबाबतच्या एका जनहित याचिकेवर सुनावणीवर कोर्टाने राजकीय पक्षांना नोटीसाही बजावल्यात.

कोर्टाच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातल्या बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष या दोन बड्या पक्षांना मोठा फटका बसणार आहे. या दोन्ही पक्षांची काही विशिष्ट जातींची मोठी व्होटबँक आहे. 2014 च्या निवडणुकांवर लक्ष ठेवून बसपाच्या अध्यक्षा मायावतींनी नुकतीच लखनौमध्ये ब्राम्हणांची सभा घेतली होती.

पण अलाहाबाद हायकोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे अशा सभांवर गदा येणार आहे. कोर्टाने दोषी ठरवलेल्या आमदार-खासदारांचं सदस्यत्व रद्द होणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय बुधवारी सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यापाठोपाठ  हायकोर्टाच्या या निर्णयामुळे राजकारणाची साफसफाई होण्याची आशा व्यक्त केली जातेय.

close