नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी कमांडो पथक तयार

January 20, 2009 11:09 AM0 commentsViews: 1

20 जानेवारी नवी मुंबईमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एनएसजीनं प्रमुख भूमिका बजावली. एनएसजीच्या धर्तीवरच राज्यात एक स्पेशल फोर्स असावी असं म्हटलं गेलं होतं. मुंबई बरोबरच अतिरेक्यांच्या कारवायाचा नव्यानं केंद्र बिंदू ठरणा-या नवी मुंबईला सुरक्षित ठेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी 40 जणांचं कमांडो पथक तयार केलं आहे.गुजरात बॉम्बस्फोटाचा ई-मेल नवी मुंबईतून करण्यात आला होता. एवढंच नव्हे तर स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या गाड्याही नवी मुंबईतून चोरण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. यासाठी 40 कमांडोचं एक विशेष पथक बनवण्यात आलं आहे. पुण्यातून स्पेशल ट्रेनिंग घेऊन आता हे कमांडो नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत. शहरात कोणताही हल्ला झाल्यास हे कमांडो एनएसजी प्रमाणं धडक कारवाई करतील. सध्या या कमांडोकडे कारबाईन आहेत. पण, लवकरच त्यांच्या हातात अत्याधुनिक हत्यारं असतील. अतिरेकी प्रत्येकवेळी नवनवीन शक्कल लढवतात. अद्ययावत शस्त्रांनी कारवाया करणा-या अतिरेक्यांना मारण्यासाठी या कमांडोंना विशेष पद्धतीनं तयार करण्यात आलं आहे.20 ते 21 वयोगटातील या तरुणांची नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातून निवड करण्यात आली आहे. तर आम्हाला कायम स्वरूपी कमांडो ठेवावं अशी मागणी या तरुणांनी केली आहे. या कमांडोंच्या पथकांच नवी मुंबईकरांनी स्वागत केलं आहे. आणि आणखी अशी कमांडोपथक तयार करावित अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

close