आरोपींनी बलात्कार पीडितेची छाटली जीभ

July 11, 2013 9:23 PM0 commentsViews: 659

Image img_239052_nagpurrape4_240x180.jpg11 जुलै : उत्तर प्रदेशातल्या प्रतापगडमध्ये बलात्कार प्रकरणात बचावलेल्या एका अल्पवयीन मुलीची जीभ छाटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. या पीडित मुलीनं कोर्टात जबाब देऊ नये, यासाठीच आरोपींनी हे कृत्य केल्याचं मुलीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. 22 जानेवारी रोजी या मुलीवर बलात्कार झाला होता आणि 24 जुलै रोजी तिचा जबाब नोंदवण्यात आला होता. पण ही केस मागे घेण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. याप्रकरणातला मुख्य आरोपी जेलमध्ये आहे आणि इतर दोघे फरार आहेत असं पोलिसांनी सांगितलंय.

close