शाहरूखचा दानशूरपणा

January 20, 2009 2:11 PM0 commentsViews: 1

20 जानेवारी, मुंबई सुपरस्टार शाहरूख खान हा काही फक्त छोट्या पडद्यापुरता हिरो नाहीय, हे त्यानं सिद्ध केलंय. श्रीनगर इथे ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्या दोन छोट्या मुलांचा उपचाराचा सर्व खर्च तो करत आहे. तीन वर्षांची अमिना आणि पाच वर्षांचा मुदस्सर या अनाथ मुलांवर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शाहरूखनं त्यांच्या उपचारासाठी 50 लाख रुपये दिलेत. किंग खाननं आपल्या आईच्या स्मरणार्थ नानावटीत मुलांचा वॉर्ड उभारलाय. तिथेच या मुलांवर उपचार सुरू आहेत.

close