अमेरिकेत नवी पहाट

January 20, 2009 3:22 PM0 commentsViews: 4

20 जानेवारी बराक ओबामा अमेरिकेचे 44 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतील. हा दिवस अमेरिकेसाठी ऐतिहासिक आहे. कारण अमेरिकेत प्रथमच एका कृष्णवर्णीयाची अध्यक्षपदी निवड झाली आहे. मार्टीन ल्युथर किंग यांच्यामुळे अमेरिकेला पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष मिळाला. बराक ओबामा यांचा शपथविधी सोहळा संपूर्ण जग पाहील.अमेरिकेतील या समारंभाच्या दिवशी एक परंपरा आहे.अध्यक्ष आणि त्यांचं कुटुंब सकाळी सगळ्यात आधी सेंट जॉर्ज चर्चमध्ये जातं. त्यानंतर ओबामा, उपाध्यक्ष बायडन आणि त्यांचे कुटुंबीय त्यानंतर व्हाईट हाऊस येथे मावळते अध्यक्ष जॉर्ज बुश कुटुंबांची यांची भेट घेतील. शपथविधीसोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी सुरू होईल. उपाध्यक्ष बायडन प्रथम असोसिएट जस्टिस जॉन पॉल स्टिव्हन्स यांच्याकडून शपथ घेतील. आणि त्यानंतर ओबामा अध्यक्ष म्हणून चीफ जस्टिस जॉन रॉर्बट्स यांच्याकडून शपथ घेतील. 1861 साली अब्राहिम लिंकन यांनी शपथ घेतलेल्या बायबलवर हात ठेवून ओबामा ही शपथ घेणार आहेत. हे ईश्वरा माझ्या पाठीशी उभा रहा अशी या शपथेविधीची शेवटची ओळ असेल.

close