‘होय, मी हिंदू राष्ट्रवादी’

July 12, 2013 11:06 PM12 commentsViews: 2427

Image img_234392_narendramodibjp34_240x180.jpg12 जुलै : होय, मी हिंदू राष्ट्रवादी आहे आणि यात काहीच चुकीचं नाही अशी स्फोटक मुलाखत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलीय. 2002 च्या दंगलीत आपण काहीच चुकीचं केलं नाही, असंही मोदींनी स्पष्ट केलंय.

काही चुकीचं केलं तरच आपल्याला अपराधी वाटेल, असंही मोदींनी म्हटलंय. 2002 दंगलीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या एसआयटीनं आपल्याला क्लीन चीट दिल्याचं त्यांनी सांगितलंय. लोकांना टीका करण्याचा अधिकार आहे. काही वाईट घडलं तर माणूस म्हणून मला वाईट वाटतं, असंही मोदींनी मत व्यक्त केलं.

 

 

या मुलाखतीतला काही भाग

प्रश्न : लोक आज पण आपल्याला 2002 दंगली प्रकरणी दोषी धरतात, आपल्याला अडचण येत नाही का?
मोदी : लोकांना बोलण्याचा अधिकार आहे. हा लोकशाहीचा देश आहे. इथं प्रत्येका आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मला अडचण जेंव्हा होते तेंव्हा मी काही चुकीच केलं. अडचण जेंव्हा होते तेंव्हा आपण चोरी करत आहोत आणि पकडले गेलोत. माझ्या बाबतीत असं नाही.
प्रश्न : जे काही झाले त्याबद्दल आपल्याला पश्चाप होत नाही का?
मोदी : मी तुम्हाला सांगतो, आपलं सुप्रीम कोर्ट देशातील सर्वोच्च आहे. गुजरात दंगली प्रकरणी कोर्टाने एसआयटीकडे तपास दिला. तपासाचा अहवाल आला त्यात मला क्लिन चीट देण्यात आली. दुसरी गोष्ट अशी की, जर एखादी कार धावत आहे आणि आपण त्या कारमध्ये मागे बसला आहात आणि आपल्या कार खाली एखादा कुत्रा आला तर दुख होतं की नाही. नक्कीच दुख होतं. मी मुख्यमंत्री असो अथवा नसो पण मी एक माणूस आहे. जर कुठे काही एखादी दूखद घटना घडली तर स्वाभाविकच दुख होणारच.
प्रश्न : गुजरात दंगलीच्या वेळी आपल्या सरकारचा दृष्टीकोन वेगळा असायला हवा होता?
मोदी : मी मानतो की, परिस्थिती हाताळण्यात आम्ही पूर्ण ताकदीनं काम केलं.
प्रश्न : तुम्हाला वाटतं की तुम्ही 2002 च्या दंगलीत योग्य केलं?
मोदी : नक्कीच योग्य केलं. देवानं आपल्याला चांगली बुद्धी दिलीय. जो काही माझ्याकडे अनुभव होता आणि त्या परिस्थिती आमच्याकडे जे काही होतं त्याचा आम्ही पूर्ण वापर केला. याच गोष्टीचा एसआयटीनेही तपास केला.
प्रश्न : तुम्हाला वाटतं देशात धर्मनिरपेक्ष नेता असायला हवा?
मोदी : हो मी मानतो पण सेक्युलरीझम ची व्याखा काय आहे. माझ्यासाठी सेक्युलरीझम म्हणजे देश आहे. माझ्या पक्षाचा मुख्य उद्देश आहे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे. हे आमचं सेक्युलरीझम आहे.
प्रश्न : टीकाकार म्हणतात तुम्ही हुकुमशहा आहेत, समर्थक म्हणतात तुम्ही निर्णय घेणारे नेते आहात. वास्तवात मोदी काय आहे?
मोदी : जर तुम्ही स्वत:ला नेते समजतात तर तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी. जर तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. लोक आपल्याकडून अपेक्षा ठेवतात आपण निर्णय घ्यावा. तरच लोकं तुमचं नेतृत्त्व स्वीकार करतील. हे तर गूण आहे, यात नकारात्मक बाब कोणतीच नाही. दुसरी गोष्ट अशी की, जर तुम्ही हुकुमशहा आहात तर इतकी वर्ष सरकार कसं चालवलं आणि त्यात यशस्वी कसे झालात? सर्वांना सोबत घेऊन तुम्ही काम कसं केलं आणि यात यश कसं मिळवलं. म्हणून मी म्हणतो, गुजरातचा विकास हा एकट्या मोदीचा नाही तर टीम गुजरातचा आहे.

 • Kunal Shirsathe

  dikhadiye naa asali rang!!!!!

  • पेंडश्यांचा तेजस

   kya rang dikha diye bhai jara batade…

   • पेंडश्यांचा तेजस

    tum jaise logon ko na pakistan bhej dena chahiye…

  • sharang

   कुणाल शिर्साठे काय रंग दिसले …….

  • Tarun

   SAHI…मग काय हिंदू फक्त सहनच करत राहा पृथ्वी च्या अंतापर्यंत असा शिकवितो अन काय दुसर्या धर्मामध्ये हिंदू धर्मियांना फक्त मारताच राहा असा लिहिला आहे कि काय ??? ज्या वेळेस एखादा दहशतवाद्या सारखा दिसणारा माणूस तुमच्या सारख्या लोकांच्या घर शेजारी फक्त राहायला जरी आला किंवा तुमच्या सारख्यांच्या घरातल्या बयाना बाजारात जरी 2,3 वेळेस दिसला न तेंव्हा सगळ अध्यात्म एकदम आठवेल तेंव्हा त्याला घरात बोलावून मुजरा अर्रांगे करा !

 • Malhar Takle

  ‪#‎NaMo‬ ‪#‎NarendraModi‬ नि एक गोष्ट लक्षात घ्यावी कि हिंदू असणे काहीच चुकीचे नाहीये आणि ‪#‎हिंदू‬ कधीच दहशतवाद किंवा इतर धर्मांविरुद्ध हिंसा करा असे शिकवत नाही जे तुम्ही २००२ मध्ये गुजरात दंगलीच्या वेळी केलेत आणि त्यावरून सिद्ध होते कि तुम्ही खरे हिंदू नाहीत तर राजकीय फायद्यासाठी ‪#‎Feku‬ हिंदू आहात..
  #NaMo #NarendraModi should keep in mind that being ‪#‎Hindu‬ is not wrong and‪#‎Hinduism‬ never preaches Terrorism & Violence against other religions which you practiced in 2002 Gujarat Riots.That proves you are not a Real Hindu but a #Feku Hindu

  • tejas

   तुमच्या सारख्या लोकांना मुस्काडला पाहिजे भर चौकात. जेंव्हा सुंठ करायची वेळ येईल तेंवा बसा मग बोंबलत

  • Tarun

   मग काय हिंदू फक्त सहनच करत राहा पृथ्वी च्या अंतापर्यंत असा शिकवितो अन काय दुसर्या धर्मामध्ये हिंदू धर्मियांना फक्त मारताच राहा असा लिहिला आहे कि काय ??? ज्या वेळेस एखादा दहशतवाद्या सारखा दिसणारा माणूस तुमच्या सारख्या लोकांच्या घर शेजारी फक्त राहायला जरी आला किंवा तुमच्या सारख्यांच्या घरातल्या बयाना बाजारात जरी 2,3 वेळेस दिसला न तेंव्हा सगळ अध्यात्म एकदम आठवेल तेंव्हा त्याला घरात बोलावून मुजरा अर्रांगे करा !

  • Kalpesh Bhogale

   Areee pan agodar train jalali teee konich bolat kaa nahi media vale pan bolat nahi

 • Rameshwar

  Whatever Modi said about I am borned hindu is absolutely correct.

  Pandit Neharu said I am accidental hindu.

  We are the follower of Swami Vivekanand and not the Neharu

  • Meghana Abhyankar

   Hinduism is not a one book religion. Hence every hindu is secular because hindu religion does not prescribe elimination of non believers. Yesterday while watching live debate I really felt pity for the Anchor Alka Dhupkar for exhibiting her lack of knowledge with over confidence. She must know that Modi was not found involved in hatching any riot by the SIT.

   • Snehal

    Kay krnar! Mi tya aajcha sawal chya video khali tichyawar jam comments taklya.. aata thodi sudharna hoil tichyat ashi aasha karuyat!

close