ओबामांनी दाखवला भारतीय टॅलेंटवर विश्‍वास

January 20, 2009 3:42 PM0 commentsViews:

20 जानेवारी अमेरिकेचे नवे अध्यक्ष बराक ओबामांनी भारतीय टॅलेंटवर विश्‍वास दाखवला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या नव्या ऑफिसमध्ये नऊ भारतीयांचा समावेश असणार आहे. त्यात इंटरनल अफेअर ऑफिसच्या संचालक म्हणून निक राठोड यांची नेमणूक झाली आहे. पराग मेहता हे आशिया पॅसिफिक अफेअर्स आणि मायनॉरिटीज ग्रुप अफेअर्सचे उपसंचालक असणार आहेत. तर आरती राय ह्या सायन्स टेक्नॉलॉजी, स्पेस, आर्ट आणि ह्युमन वर्कच्या समिती सदस्य असणार आहेत. इंटरनॅशनल ट्रेड अँड फायन्सास कमिटीच्या सदस्यपदी अंजन मुखर्जी यांची निवड करण्यात आली आहे. तर रचना भौमिक, शुभाश्री रामनाथन, नताशा बिलिमोरिया यांची राष्ट्रीय सुरक्षितता, संरक्षण, गुप्तचर खातं आणि शस्त्रास्त्र नियंत्रण संघटनेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. परराष्ट्र संबंधविषयक समितीच्या सदस्यपदी पुनित तलवार यांची निवड झाली आहे. तर डॉ. संजय गुप्ता यांची सिव्हिलियन सर्जन जनरल म्हणून नेमणूक झाली आहे.

close