‘जे झालं ते झालं’

July 12, 2013 8:21 PM0 commentsViews: 1344

12 जुलै : स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जे झालं ते झालं पण आपली विचारसरणी एक आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन यूपीए सरकारला मोठं करायचं आहे. आपल्याला लोकसभा, विधासभेला एकत्र सामोरं जायचंय. आपल्याला जास्त उमेदवार निवडून द्यायचं काम करायचं आहे. कुठ आम्हाला संधी मिळेल कुठे तुम्हाला संधी मिळेल. पुरोगामी महाराष्ट्रात यूपीए सरकार निवडून द्यायचं आहे अशी विनंती उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. सांगलीत महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी काँग्रेसचे नेत नारायण राणे, पंतगराव कदम यांच्यावर विखारी टीका केली होती. मात्र निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे. मात्र अजित पवारांनी झाली गेलं विसरून जा असा आग्रह केलाय.

close