दयानंद पांडेच्या लॅपटॉपमधून महत्त्वपूर्ण खुलासे

January 21, 2009 6:49 AM0 commentsViews: 1

21 जानेवारीमालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींवर मंगळवारी आरोप पत्र दाखल करण्यात आलं. यात अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहित याला देशाची राज्यघटनाच मंजूर नव्हती. त्यासाठी समांतर सरकार बनवण्याची त्यांची योजना होती. दयानंद पांडे याच्या लॅपटॉप मधून ही माहिती मिळाली आहे. अभिनव भारतच्या पदाधिकार्‍यांनी एका गुप्त बैठकीत संघटनेचा एक अजेंडा तयार केला. या बैठकीला लेफ्टनंट कर्नल पुरोहित, दयानंद पांडे यांच्या व्यतिरिक्त दिल्लीचे भाजपचे माजी खासदार बी.एल. शर्मा, कर्नल धर, मेजर रमेश उपाध्याय, डॉक्टर आर.पी. सिंग, अनिलजी महाराज, आणि कर्नल आदित्यनाथ यांचाही सहभाग होता. या बैठकीत सेंट्रल हिंदू राष्ट्राची राज्यघटना आणि सरकारचा आराखडा तयार केला गेला. त्यांना समांतर सरकार स्थापन करायचं होतं. त्यासाठी ते इतर देशांची मदत घेणार होते. इस्त्राएल आणि नेपाळ या देशांच्या संपर्कात कर्नल पुरोहित होते. या आरोपींवर मंगळवारी दाखल केलेल्या आरोपपत्रावर आज सुनावणी होणार आहे.

close