‘तक्रार करायची तर करा’

July 12, 2013 9:34 PM0 commentsViews: 688

12 जुलै : माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी कुणाकडे काय तक्रार करायची आहे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या अधिकाराचा कसा वापर करावा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यात मी काहीही बोलणार नाही असं सांगत अजित पवारांनी माणिकरावांना टोला लगावला. ते औरंगाबादेत बोलत होते. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत अजित पवारांनी वेगळाच सूर लगावला. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जे झालं ते झालं पण आपली विचारसरणी एक आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन यूपीए सरकारला मोठं करायचं आहे. आपल्याला लोकसभा, विधासभेला एकत्र सामोरं जायचंय. आपल्याला जास्त उमेदवार निवडून द्यायचं काम करायचं आहे. कुठ आम्हाला संधी मिळेल कुठे तुम्हाला संधी मिळेल. पुरोगामी महाराष्ट्रात यूपीए सरकार निवडून द्यायचं आहे अशी विनंती अजित पवार यांनी केली. सांगलीत महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी काँग्रेसचे नेत नारायण राणे, पंतगराव कदम यांच्यावर विखारी टीका केली होती. मात्र निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे. मात्र अजित पवारांनी झाली गेलं विसरून जा असा आग्रह केलाय.

close