विलासरावांचा गडकरींवर अब्रुनुकसानीचा दावा

January 21, 2009 7:43 AM0 commentsViews: 4

21 जानेवारी, मुंबईमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरींना कोर्टात खेचलं आहे. गडकरी यांच्या विरोधात विलासरावांनी अब्रुनुकसानीचा फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी भोईवाडा कोर्टात अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा दाखल केलाय. गडकरी यांनी 18 डिसेंबर 2008 रोजी विधानपरिषदेत विलासरावांविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. सायन -पनवेल रस्त्याचं 200 कोटी रुपयांचं काम इंडियाबुल या कंपनीला देण्यासाठी विलासरावांनी दबाव आणला, तसंच मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केलेला असताना या बाबतची फाईल मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांकडून क्लिअर केल्याचा आरोप गडकरींनी केला होता. इंडिया बुल या कंपनीत विलासरावांचा मुलगा अमित आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची पार्टनरशीप असल्याचाही आरोप केला होता. त्याविरोधात आता विलासरावांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाआहे.

close