कर्नाटकात इंडियन एअरफोर्सचं विमान कोसळलं, 1 पायलट ठार

January 21, 2009 8:04 AM0 commentsViews:

21 जानेवारी, बिदरइंडियन एअरफोर्सचं सूर्यकिरण विमान कोसळलं आहे. कर्नाटकातल्या बिदरजवळ हे विमान कोसळलं. या घटनेत एक ट्रेनी पायलट ठार झाला. एर. एस दहिवाल असं मृत पायलटचं नाव आहे. सराव चालू असताना हा अपघात झाला. लो लेव्हल एओरोबिक्सचा सराव चालू असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेच्या न्यायलयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेतय त्यातूनच खरी माहिती बाहेर पडेल. मात्र प्राथमिक अंदाजानुसार पक्ष्याला विमान धडकल्यामुळे हा अपघात घडला. भारताच्या हवाई सज्जतेबद्दल प्रश्नचिन्ह उठत असताना हा अपघात झाल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सूर्यकिरण विमानाचे पायलट हे अनुभवी आणि प्रशिक्षित असतात.

close