कोल्हापुरात नोटांचा पाऊस

July 13, 2013 3:53 PM0 commentsViews: 5482

13 जुलै : राज्यभर सर्वत्र पाऊस पडत असतानाच कोल्हापुरात शुक्रवारी जणू पैशांचा पाऊस पडला. शहरातील गांधी मैदानात लहान मुलांना नोटांचा प्रचंड मोठा ढीग आढळला. या नोटा नकली असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र परिक्षणाअंती त्या नोटा खर्‍या असल्याचं स्पष्ट झालंय. 1 रु. पासून ते 1 हजार रूपयापर्यंतच्या नोटा यात आहेत. एकूण 4 हजार रुपयाच्या या नोटा कुणी आणि का टाकल्या याचा शोध पोलीस घेत आहे. मात्र या नोटा बघायला बघ्यांची एकच गर्दी मात्र जमली होती.

close