सीमाप्रश्नावरून राज्यभर आंदोलन

January 21, 2009 6:44 AM0 commentsViews: 2

पुण्यात एटीएम आणि सिनेमा थिएटरची नासधूस21 जानेवारी, पुणेनितीन चौधरीमहाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नावरचा वाद चिघळला आहे. धारवाडमधल्या महाराष्ट्र बँकेवर हल्ला केला होता. त्या हल्ल्याला प्रत्युतर म्हणून भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या कर्नाटक बँकेच्या एटीएमला भगवा रंग फासला. पुण्यातल्याच रतन थिएटरची तोडफोड शिवसैनिकांनी केली. रतन थिएटरमध्ये कानडी भाषेतले सिनेमा लागतात. दुपारी 12.30 ला कानडी सिनेमाचा खेळ चालू होतो. पण शिवसैनिकांनी 11.30 वाजता थिएटरवर हल्लाकरून कानडी सिनेमाचा खेळ बंद पाडला. या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. औरंगाबादमध्ये छावाचं जोडे मारो आंदोलन माधव सावरगावे21 जानेवारी, औरंगाबादऔरंगाबादमध्येही सीमाप्रश्नावरून आंदोलन केलं. छावाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जोडे मारो आंदोलन सुरू केलं. क्रांती चौकातल्या या आंदोलनात बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे, मराठी माणसांवर अन्याय करू नका अशा घोषणाही त्यावेळी दिल्या. छावाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमधल्या कर्नाटक बँकेवर हल्ला केला. या बँकेसमोर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचाही पुतळा जाळण्यात आले. त्यामुळे बँकेच्या कर्मचा-यांनी बँक बंद करण्याचा निर्णय घेतला.

close