महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीला राहुल गांधींची दांडी

July 13, 2013 1:07 PM0 commentsViews: 365

RAHUL IN GUPTKASHI_113 जुलै : आज राज्यातल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक झाली.महाराष्ट्रतल्या काँग्रेसच्या संघटनेबद्दल या बैठकीत राहुल गांधींसोबत चर्चा होणार होती. पण राहुल गांधी या बैठकीला आलेच नाहीत. तब्बल दीड तास काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांची वाट बघितली आणि अखेर संघटनेबद्दल आपआपसात चर्चा करुन ही बैठक संपली.

 

तब्बल दीड तास राहुल गांधींसाठी ताटकळत बसल्यानंतर आता मात्र राहुल गांधी या बैठकीला येणारच नव्हते असा उलटा दावा काँग्रेसकडून केला जातोय. सांगली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी बरोबर समन्वय समितीची बैठक तात्काळ बोलवावी असा निर्यण यात झाल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या टिकेबद्दल मोहन प्रकाश यांना माहिती दिलीय ते ही माहिती पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना देतील असंही माणिकराव ठाकरे यांनी सांगितलंय. राज्याचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, गुरुदास कामत आणि प्रतिक पाटील हे नेते या बैठकीला हजर होते.

close