शिवसेनेचे आ.संजय जाधवांना 3 महिन्यांची सक्तमजुरी

July 13, 2013 2:25 PM0 commentsViews: 871

sanjay jadhavपरभणी 13 जुलै: शिवसेना आमदार संजय जाधव यांना 3 महिन्यांची सक्तमजुरी आणि 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिलाय. तीन वर्षांपुर्वी संजय जाधव यांनी महावितरण कार्यालयात तोडफोड केली होती आणि या तोडफोडीदरम्यान कार्यकारी अभियंता व्ही.एन. सावंत यांच्यासोबत जाधव यांना मारहाण केली होती.

 

परभणीत संबर या तालुक्यातील शेतकर्‍यांनी टान्सफार्मची मागणी केली होती. यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता व्ही.एन. सावंत यांची भेट घेण्यासाठी गेले असता सावंत यांनी भेट नाकारली. त्यानंतर या शेतकर्‍यांनी संजय जाधव यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. संजय जाधव यांनी या प्रकरणी सावंत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सावंत यांनी भेट देण्यास नकार दिला. यानंतर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. तसंच जाधव यांची अधिकार्‍यांशी बाचाबाची झाली आणि पर्यायाने मारहाणीत रूपांतर झाले. या प्रकरणी अधिकार्‍यांनी संजय जाधव यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. आज सत्र न्यायालयाने जाधव यांनी 3 महिन्यांची सक्तमजुरी आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.

close