मुंबई-गोवा हायवेवर बस-ट्रक अपघातात 4 ठार

July 13, 2013 4:49 PM0 commentsViews: 565

gova mumbai haiway accident13 जुलै : मुंबई-गोवा हायवेवर शुक्रवारी मध्यरात्री भरधाव लक्झरी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 4 जण ठार तर 23 प्रवासी जखमी झालेत. त्यातील 3 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमधले 2 प्रवासी ट्रक मधून प्रवास करत होते. त्यात शिवानी चव्हाण या चिमुरडीचा समावेश आहे. मुंबई- गोवा हायवेवरुन शुक्रवारी रात्री कोकणाकडे निघालेली लक्झरी बस आणि मुंबईकडे येणारा ट्रक यांच्यात वीर गावाजवळ समोरासमोर टक्कर होऊन हा अपघात झाला. गंभीर जखमींवर महाड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन मुंबईतील सायन रुग्णालयात पाठवण्यात आलंय. अपघातानंतर महामार्गावरची वाहतूक 2 ते 3 तास ठप्प होती. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

close