प्राण पंचत्वात विलीन

July 13, 2013 5:43 PM0 commentsViews: 342

3 जुलै : बॉलिवडूचा खलनायक ते नायक अभिनेते प्राण यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर दादरच्या स्मशानभुमीत, विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. सर्वसामान्य चाहत्यांबरोबरच बॉलीवूडमधले अनेक दिग्गजही यावेळी उपस्थित होते. शुक्रवारी रात्री 8.30 वाजता लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. प्राण यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बॉलीवूडमधले ते खलनायक होते. तब्बल सहा दशकं त्यांनी खलनायक म्हणून पडदा गाजवला. अमिताभ बच्चन यांच्यासोबतची जंजीरमधली त्यांची शेरखानची भूमिका अजरामर आहे. 2 फेब्रुवारी 1920 मध्ये त्यांचा जन्म झाला. आपल्या कारकीर्दीची सुरुवात त्यांनी एका स्टुडिओत कॅमेरा डिपार्टमेंटमधून केली. त्यानंतरच्या काही वर्षांतच ते बॉलीवूडचे लोकप्रिय खलनायक झाले. अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. नुकताच त्यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारनं सन्मान करण्यात आला होता.

close