खुनाचा थरार कॅमेर्‍यात कैद

July 13, 2013 6:59 PM0 commentsViews: 2572

13 जुलै : शिर्डीमधल्या रेल्वे स्टेशनवरच्या दुहेरी खून प्रकरणातल्या संशयित आरोपीला कल्याणमध्ये अटक करण्यात आली आहे. शिर्डी रेल्वे स्थानकावर आठ जुलैला झोपलेल्या भिकार्‍याचा दगडाने खून करण्यात आला होता. त्यामध्ये या संशयिताचा हात असल्याचा संशय आहे. शिर्डीतल्या खुनाचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालंाय. या प्रकरणी मारेकर्‍याची ओळख पटली असून सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शिर्डी पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या मारेकर्‍याचा तपास लावला. गेल्या वर्षी मुंबईत दगडाने ठेचून खून करण्याच्या घटना घडल्यात. या सर्व घटनांचा या संशयिताशी संबंध आहे का याचाही शिर्डी पोलीस तपास करत आहे.

close