नागपूर विद्यापीठात तोडफोड

January 21, 2009 9:51 AM0 commentsViews: 2

21 जानेवारी, नागपूरनागपूर विद्यापीठात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. विद्यापीठातल्या हॉस्टेलची स्थिती खराब असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यासाठी त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू एस. एम. पठाण यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. पण ही भेट होण्याआधीच या विद्यार्थ्यांनी तोडफोड केली.नागपूर विद्यापीठाच्या दोन्ही हॉस्टेल्सची स्थिती अतिशय वाईट आहे. त्याविरुद्ध वारंवार आवाज उठवण्यात आला होता. मात्र प्रशासनानं त्याकडे डोळेझाक केल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. गुणपडताळणी पद्धतीबाबतही विद्यापीठ प्रशासनाचे विद्यार्थी संघटनांबरोबर वाद आहेत. या प्रश्नी चर्चा करण्यासाठी कार्यकर्ते विद्यापीठाच्या आवारात जमले आणि चर्चेआधीच आंदोलनाचा भडका उडाला.विद्यापीठाच्या हॉस्टेल्समध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारासारख्या भागातील गरीब मुले रहातात. हॉस्टेल मोडकळीस आलं असून तेथे पिण्याच्या पाण्याचीही मोठी कमतरता आहे. या प्रश्नांबाबत कुलगुरूंशी भारतीय जनता मोर्चाच्या कार्यकर्त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र मोठ्याांख्येने विद्यार्थी कुलगुरूंच्या केबीनमध्ये जमल्यानं तेथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.

close