माऊलींची पालखी आज नातेपुते मुक्कामी

July 13, 2013 8:59 PM0 commentsViews: 195

tukobanchi palkhi13 जुलै : बरड मुक्कामी झालेल्या असुविधेमुळे नाराज झालेल्या वारकर्‍यांनी आज नातेपुतेमध्ये प्रस्थान ठेवलं. दुपारी 12 च्या सुमारास माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आली. त्यावेळी सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने माऊलींना निरोप दिला. दुपारी धर्मपुरीचा विसावा घेऊन माऊलींची पालखी आज नातेपुते मुक्कामी विसावली. तुकारामांच्या पालखीनं इंदापूरहून प्रस्थान केलंय आणि पालखी आज तराटी मुक्कामी असणार आहे. दरम्यान पालखीच्या प्रवासात इंदापूर ते बावडा यादरम्यान राज्याचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील सहकुटुंब चालत होते. उद्या सकाळी माऊलींच्या पालखीतलं पहिलं गोल रिंगण सदाशिवनगर इथं रंगणार आहे. तुकोबांच्या पालखीतलं तीसरं गोल रिंगण आकलूजमधल्या माने विद्यालयात पार पडणार आहे. त्यापूर्वी तुकाबांच्या पादुकांना नीरास्थान घातलं जाणार आहे.

close