औरंगाबादच्या वेरॉक इंजिनिअरिंगमध्ये तोडफोड

January 21, 2009 8:32 AM0 commentsViews: 2

21 जानेवारी, औरंगाबादसंजय वरकडऔरंगाबादच्या वाळुंज परिसरातल्या वेरॉक इंजिनिअरिंगमध्ये तोडफोड करण्यात आली. मराठी कामगारांना कामावरून कमी केलं म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे. वेरॉक इंजिनिअरिंगमध्ये 150 ते 200 लोकांचा समूह आत शिरला आणि वर्कशॉपमध्ये तोडफोड केली. याशिवाय कामगारांच्या वेतन कपातीच्याबाबतीतही काही मागण्या होत्या.मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्याच साहित्याचा वापर करून नासधूस करण्यात सुरुवात केली. त्यांनतर वाळुंज परिसरातल्या इतर दोन प्लांटमध्येही तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्यांमुळे वाळुंज परिसरातले नागरिकही घाबरलेत. जागतिक मंदी, परप्रांतियांचं आंदोलनामुळे आधीच वेरॉक इंजिनिअरिंगला धक्का बसलाय. त्यात आता मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे कंपनीचं प्रॉडक्शनचं काम पूर्णपणं थांबलं आहे. वेरॉक इंजिनिअरिंगमध्ये असलेल्या मनसेच्या युनियनमुळं हल्ला करणं सोपं गेलं, असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. या दुघर्टनेमध्ये 5 जण जखमी झाले आहेत. त्यातल्या 3 जखमी महिलांना वाळुंज गावातल्या दवाखान्यात नेलं.

close