बोफोर्स घोटाळ्यातील संशयित क्वात्रोचीचा मृत्यू

July 13, 2013 11:13 PM0 commentsViews: 456

kavatro13 जुलै :इटालियन उद्योगपती ओतावियो क्वात्रोचीचा इटलीमध्ये हार्ट ऍटॅकने मृत्यू झाला. क्वात्रोची हा बोफोर्स तोफ घोटाळ्यातला संशयित होता. क्वात्रोचीचे गांधी घराण्याशी जवळचे संबंध होते आणि 80च्या दशकात तोफांचं कंत्राट बोफोर्सला मिळण्यामागे क्वात्रोचीचा मोठा हात असल्याचा आरोप होता.

 

1983 मध्ये भारत सरकारने स्वीडन येथील एबी बोफोर्स कंपनी कडून 155 एमएमचे 410 बोफोर्स तोफ खरेदी केले होते. हा संपूर्ण व्यवहार 1437 कोटींचा होता. 16 एप्रिल 1987 ला स्वीडिन येथील रेडिओने या खरेदी व्यवहारात कंपनीने लाच दिली असा गौप्यस्फोट केला होता. या व्यवहारात क्वोत्रोचीवर मध्यस्थी करण्याचा आरोप करण्यात आला होता. 22 जानेवारी 1990 ला सीबीआयने आपल्या अहवालात ही बाब नमूद केली होती. दोन वर्षांपूर्वीच ही केस बंद करण्यात आलीय.

close