उत्तराखंड: महाप्रलयात बेपत्ता 5700 मृत घोषित

July 15, 2013 2:14 PM0 commentsViews: 873

utrakhand flood 21 june15 जुलै :उत्तराखंडमध्ये प्रलंयाकारी पूर येऊन हाहाकार माजण्याच्या घटनेला आज एक महिना पूर्ण होतोय. या घटनेमध्ये अजूनही 5700 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, मात्र त्यात फारसं यश मिळत नसल्यानं त्यांना उत्तराखंड सरकार मृत घोषित करणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतरच त्यांच्या कुटुंबीयांना मदतनिधी मिळणं शक्य होणार आहे. राज्य सरकारतर्फे प्रत्येकी साडेतीन लाख तर केंद्रातर्फे दीड लाख रुपयांची मदत दिले जाणार आहेत. या महाप्रलयात एक हजार लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती राज्य सरकारने दिली होती. या महाप्रलयात केदारनाथ मंदिर, बद्रीनाथ आणि उत्तराखंड इथं प्रचंड नुकसान झालाय. सध्या पुनर्वसनाचा काम सुरू आहे.

close