रत्नागिरीत विद्युतसेवकांची भरती राणे समर्थकांनी उधळली

July 15, 2013 2:42 PM0 commentsViews: 526

ratnagiri rane15 जुलै : रत्नागिरी जिल्हयात महावितरण मध्ये सुरु असलेली विद्युतसेवकांची भरती उद्योगमंत्री नारायण राणे समर्थकांनी बंद पाडलीय. या भरतीत आधी स्थानिकांना जोपर्यंत सामावून घेतलं जात नाही तोपर्यंत परजिल्ह्यातल्या एकाही विद्युत सेवकाची भरती होऊ देणार नाही, असा इशारा राणे समर्थकांनी दिलाय.

 

आज रत्नागिरी विभागात 280 विद्युत सेवकांना भरतीसाठी नियमानुसार बोलावण्यात आलंय. पण या भरतीत स्थानिक उमेदवार नाहीत. हे कारण पुढे करत राणे समर्थकांनी महावितरणच्या कार्यालयात घुसुन अधिकार्‍यांशी हुज्जत घातली. जोपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित होत नाही तोपर्यंत कार्यालयात बसून राहण्याचा निर्णय या कार्यकर्त्यांनी घेतलाय. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या या भुमिकेला नारायण राणे यांचा पाठिंबा आहे, आणि परजिल्ह्यातील उमेदवार भरती करुन घेऊ नका असं राणेंनी बजावलं असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे.

close