सत्यमच्या प्रमोटर्सवर सेबीचे निर्बंध

January 21, 2009 12:46 PM0 commentsViews: 3

21 जानेवारी, हैदराबादसेबी म्हणजेच सिक्यूरीटी बोर्ड ऑफ इंडियाची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कंपनीच्या प्रमोटर्सनी शेअर्स गहाण ठेवण्याच्या प्रक्रियेविषयी आणि सत्यम विषयी चर्चा केली. कंपनीच्या प्रमोटर्सनी शेअर्स गहाण ठेवले, तर त्याची संपूर्ण माहिती आता सेबीला देणं बंधनकारक राहणार आहे. यामध्ये किती शेअर्स गहाण ठेवू शकता येतील याची मर्यादा प्रमोटर्स ठरवू शकतील. त्याशिवाय शेअर्स लिस्टींगच्या प्रक्रियेतही फेरबदल केले जाणार आहेत. त्याशिवाय सत्यम घोटाळ्याच्या बाबतीत सेबी बँक डिपॉझिटची पडताऴणी चालू असल्याचं सेबीचे अध्यक्ष सी.बी. भावे यांनी स्पष्ट केलं. त्याशिवाय सत्यमच्या अनेक अधिकार्‍यांची फेरतपासणी चालू आहे.या संपूर्ण प्रकरणात सर्व एजन्सींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं भावे यांनी सांगितलं.

close