विदर्भाला पावसाने झोडपले

July 15, 2013 1:07 PM0 commentsViews: 325

vidarbha4415 जुलै : विदर्भामध्ये पावसाने धुमसान घातलंय. भंडारा जिल्हयात गेल्या चोवीस तासात संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालय. वैनगंगा नदीला पूर आल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे दीड मिटरने उघडलेत. वर्धा जिल्ह्यातल्या लोअर वर्धा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.

गेल्या बारा तासांपासून सुरु असलेल्या संततधार पावसानं नागपूर शहराच्या सखल भागात पाणी साचलंय. 26 जुन रोजी देखील शहरात झालेल्या मुसळधार पावसानं पाणी साचलं होतं तीच स्थिती आजही निर्माण झालीय. हुडकेश्वर गावात 550 घरात पाणी शिरलंय. आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या बोटी नादुरुस्त असल्यानं तिथल्या लोकांना बाहेर काढणं अशक्य झालाय. दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झालाय.

close