कोल्हापूरला पावसाचा तडाखा, 2 बंधारे गेले वाहून

July 15, 2013 12:15 PM0 commentsViews: 232

kolhapur bandhara15 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 2 पाणलोट बंधारे वाहून गेले आहेत. चंदगड तालुक्यातील मांडेदूर्ग गावात आणि राधानगरी तालुक्यातील चांदे गावात हे बंधारे फुटलेत. या बंधार्‍यांचं पाणी शेतात घुसल्याने सुमारे 100 एकर शेतीचं मोठं नुकसान झालंय. मांडेदूर्गच्या बंधार्‍यासाठी सुमारे 9 लाख रुपयांचा निधी तर चांदे गावच्या बंधार्‍यासाठी 7 लाखांचा निधी वापरण्यात आला होता.

 

वसुंधरा पाणलोट विकास योजनेतून कृषी खात्यानं हे बंधारे बांधले होते. मात्र पाणी साठवण्याचं योग्य नियोजन नसल्याने आणि बंधार्‍याचे काम निकृष्ठ असल्याने हे दोन्ही बंधारे वाहून गेलेत. शहरात सध्या पावसानं उघडीप दिली असली तरी धरणक्षेत्रांध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. त्यातच चंदगड आणि राधानगरी तालुक्यामंध्ये अतिवृष्ठी सुरु असल्यानं कृषी खात्याचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आलाय. दरम्यान बंधारे फूटून 24 तास उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

close