अमेरिकेची पाकला लष्करी मदत

January 21, 2009 12:49 PM0 commentsViews: 5

21 जानेवारी, अमेरिका बराक ओबामांनी आज कामकाजाला सुरूवात करताच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातला पहिला निर्णय जाहीर केला तो म्हणजे पाकिस्तानला मदत करण्याचा. दहशतवादाशी लढण्यासाठी पाकिस्तानला देण्यात येणारी लष्करी मदत कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेलगतच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी पाकिस्तान जबाबदार असेल असंही ओबामांच्या कार्यालयातर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आलंय. तसंच पाकिस्तानला देण्यात येणारी बिगर लष्करी मदतही तिप्पट करण्यात आली आहे. मुलभूत सोयी-सुविधा, शाळा, हॉस्पिटल्स बांधण्यासाठी ही मदत करण्यात येणार आहे.

close