काँग्रेस नेत्यांचा मोदींवर प्रतिहल्ला

July 15, 2013 6:20 PM0 commentsViews: 476

15 जुलै : जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा बुरख्याआड लपतं, या मोदींच्या घणाघाती आरोपावर काँग्रेसने मोदींवर चौफेर हल्लाबोल सुरू केला आहे. काँग्रेसची धर्मनिरपेक्षता ही सर्वसमावेशक आहे, भाजपसारखी जातीयवादी नाही असं उत्तर काँग्रेसच्या नेत्यांनी दिलंय. शिक्षण, रोजगार, गरिबी हटाव, अन्नसुरक्षा अध्यादेश, कोळसा घोटाळा, रुपयाची घसरण या सर्व मुद्द्यांवर मोदींनी काँग्रेसवर रविवारी पुण्यात कडाडून टीका केली होती. देशातल्या सर्व समस्यांना काँग्रेसचं सरकारच कारणीभूत असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. आणि पुन्हा एकदा गुजरातच्या विकासाचं कार्ड पुढं केलं होतं. त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी उत्तर दिलंय.मोदींनी आधी आपली धर्मनिरपेक्षतेची व्याख्या स्पष्ट करावी असं आव्हान काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिलंय. तर अजय माकन यांनी मोदी यांच्यावर थेट हल्ला करत, त्यांच्या गुजरात विकासाच्या दाव्यालाच आव्हान दिलं. गुजरात सरकारचा कारभार, शिक्षण, क्रीडा अशा मुद्यांवरही माकन यांनी मोदींवर टीका केली.

close