राहुल गांधींची राज्यसरकारवर टीका

January 21, 2009 2:00 PM0 commentsViews: 1

21 जानेवारीराहुल गांधी यांनी राज्यसरकारला घरचा आहेर दिला आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणांची आहुती देणार्‍या पोलिसांची सरकारनं आवश्यक ती दखल घेतली नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. जयपूरमध्ये 'पोलीस दलाची सुधारणा' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. हल्ल्यातला एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात तुकाराम ओंबाळे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पण, त्यांच्या कुटुंबियांना सरकारनं पुरेशी मदत केली नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला."जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा ओंबाळेंनी सर्वस्वाचं दान दिलं. त्यांनी अतिरेक्याची बंदूक काढून घेतली. त्यांच्या पोटात सात गोळ्या घुसल्या. माझ्ये नजरेत ते खूप मोठे हिरो आहेत. जेव्हा सिस्टिम फेल होते, तेव्हा हिरोच आपलं रक्षण करतात. ओंबाळेंनी बलिदान दिलं आणि आपण त्यांच्या कुटुंबीयांना काहीच दिलं नाही. हे दुदैर्वी आहे. मुंबईवरील हल्ल्याची ही काळी बाजू आहे." असं राहुल गांधी म्हणाले.

close