नितीन राऊतांकडून राजीनाम्याच्या बातम्यांचं खंडन

July 15, 2013 6:38 PM0 commentsViews: 136

NITIN RAUT315 जुलै : आपल्या राजीनाम्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरण रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी दिलंय. त्यांची नागपुरातल्या बेझनबाग सोसायटीतली घरं अतिक्रमणात असल्याचा आरोप आहे. मात्र, आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राऊत यांनी म्हटलंय. आपण या सोसायटीचा सदस्य आहोत, आपले वडील आणि सासरे गिरणी कामगार होते असं राऊत यांनी म्हटलंय. त्याचवेळी आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडणे हे आपलं काम आहे, अशी सारवासारव त्यांनी केली.

 

राऊत यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर नागपुरातल्या बेझनबाग गृहनिर्माण सोसायटीच्या भाडेपट्टीला मुदतवाढ देऊन या ठिकाणच्या इमारती नियमित करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देत नसल्यानं, राऊत हे अस्वस्थ आहे. याच भागात त्यांचं आणि त्यांच्या नातेवाईकांची घरं आणि ऑफिस असल्यानं त्यांना ही अतिक्रमणं नियमित करून पाहिजेत अशी माहिती आहे.

या प्रकरणी न्यायायलयात याचिका असून शासनानं आपल्या फायद्याची भूमिका घ्यावी यासाठी नितिन राऊत हे दबाव आणत आहेत. या बाबतीत राऊतांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र, त्यांचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलंय.

close