मार्टिना हिंगीस ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये

July 15, 2013 6:45 PM0 commentsViews: 135

martina hingins15 जुलै : माजी वर्ल्ड नंबर वन महिला टेनिसपटू मार्टिना हिंगीसचा प्रतिष्ठेच्या ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश करण्यात आलाय. हॉल ऑफ फेमच्या एलिट क्लबमध्ये समावेश झालेली हिंगीस ही चौथी तरुण सदस्य आहे. वयाच्या बाराव्या वर्षी ज्युनिअर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावत मार्टिना हिंगीसनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

 

महिला एकेरीत पाच ग्रँड स्लॅम स्पर्धांचं जेतेपद तिच्या नावावर आहे. तर तब्बल 209 आठवडे जागतिक क्रमवारीत नंबर वन राहण्याचा मानही तिच्या नावावर आहे. दुखापतीमुळे वयाच्या बावीसव्या वर्षी टेनिसमधून तिनं निवृत्ती घेतली, यानंतर चार वर्षांनी तिनं टेनिसमध्ये पुनरागमन केलं. पण डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानं ती चर्चेत आली, पण हे आरोप तीनं फेटाळले.

close