धावपटू टायसन गे,असाफा पॉवेल डोपिंगमध्ये दोषी

July 15, 2013 6:54 PM0 commentsViews: 108

Asafa Powell15 जुलै : आंतरराष्ट्रीय दर्जाचे अव्वल तीन ऍथलिट डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकेचा धावपटू टायसन गे, जमैकाचा असाफा पॉवेल आणि ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल विजेती शेरॉन सॅम्प्सन डोपिंगमध्ये दोषी आढळले आहेत. या धावपटूंवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. टायसन गे हा 100 मीटर शर्यतीत जगातील दुसरा सर्वाधिक वेगवान धावपटू आहे. टायसन गे ए सॅम्पलमध्ये दोषी आढळला आहे. आता त्याची बी सॅम्पलची चाचणी करण्यात येणार आहे. तर जुन महिन्यात झालेल्या जमैका नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये असाफा पॉवेल डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला होता.

close