राजूची चौकशी निरर्थक ठरली

January 21, 2009 2:45 PM0 commentsViews: 7

21 जानेवारी, हैदराबादशेख अहमद गेल्या दोन दिवसांपासून सत्यमचे पदच्युत सीईओ रामलिंग राजूची कसून सीआयडी चौकशी केली जात आहे. सीआयडीनं राजूला प्रश्न विचारण्यासाठी दोनशे प्रश्नांची प्रश्नावली तयार केलीये. पणआतापर्यंत कोणत्याच निर्णयापर्यंत पोहोचता आलेलं नाही. कोठडीतला आजचाच प्रश्नोत्तरांचा शेवटचा दिवस होता. पण तोही वाया गेला. याविषयी सीएनबीसी आवाजला संपूर्ण माहीती मिळालीये.तू पत्र का लिहिलं ? तू पत्र सात जानेवारीलाच का लिहिलंस ? त्याच्या आगोदर का लिहिलं नाहीस ? तू पत्र लिहिण्याच्या आगोदर कुणाचा सल्ला घेतला होता ? या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी स्वत:च का स्वीकारलीस ? तू तुझ्या भावाचं नाव का घेतलंस ? तू सगळ्यात आधी बॅलॅन्सशीटमध्ये फेरफार कधी केलास ? यांसारख्या छोट्या छोट्या प्रश्नांचा प्रश्नावलीत समावेश होता. राजूची जवळ-जवळ 20 तास चौकशी करण्यात आली.पण पोलिस कुठलंही कठोर पाऊल उचलायला तयार नाही. राजूशी पोलीस अतिशय नरमाईनं वागताना दिसलेत. राजूनं कुठल्याच प्रश्नाचं स्पष्टपणे उत्तर दिल नाही. आता असं वाटतय की जे काही होतंय ते सगळं राजूच्या मर्जीनुसार होतंय.

close