राजापूरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

January 21, 2009 2:52 PM0 commentsViews: 30

21 जानेवारी, राजापूरबिबटे मानवी वस्तीत येण्याचे प्रकार कोकणात वाढू लागलेत. राजापूरमधील विखारे भटवाडी इथल्या एका विहीरीत पडलेला बिबट्या ग्रामस्थांना दिसला. हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात इथल्या वस्तीकडे आला होता. ग्रामस्थांनी वनविभागाला कळवल्यानंतर वनकर्मचारी तीथे पोहोचले. बिबट्याला जिवंत बाहेर काढण्यास त्यांना यश आलं, मात्र हे ठिकाण अडचणीचे असल्यामुळं बिबट्याचा पिंजरा ग्रामस्थांना खांद्यावरुन वाहून न्यावा लागला. सुमारे दोन वर्षाच्या या बिबट्यावर वैद्यकीय उपचार करुन त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.

close