मुंबईतल्या नगरसेवकानेच केलं अनधिकृत बांधकाम

January 21, 2009 2:53 PM0 commentsViews: 18

21 जानेवारी मुंबईउदय जाधव सामान्य नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केल्यास, महानगरपालिका त्यांच्यावर कारवाई करते. पण मुंबईतल्या धारावीत एका नगरसेवकाने अनधिकृत बांधकाम केलंय. मुंबई महानगरपालिकाच्या नियमांप्रमाणे कोणत्याही नगरसेवकाने अनधिकृत बांधकाम केलं असेल, तर त्याचं नगरसेवकपद जाऊ शकतं.मुंबईतील धारावी, आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी. या धारावीत एका रात्रीत मोठी अनधिकृत बांधकाम उभी राहतात. ना दाद ना फिर्यांद. धारावीचा ट्रान्झिट कॅम्प विभाग महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 176 अंतर्गत येतो. या ट्रान्झिट कॅम्प विभागात नरेश माने राहतात. इथंच त्यांचं घर आणि ऑफिस आहे. महापालिकेच्या रेकॉर्डनुसार या जागेचा क्रमांक आहे ब्लॉक क्रमांक 8, रो – आय, भूखंड क्रमांक – 5. महापालिकेच्या रेकॉर्डनुसार या भूखंडावर कुठलंही बांधकाम नाही. मात्र आयबीएन लोकमतनं जेव्हा या जागेला भेट दिली तेव्हा तिथं नरेश माने यांच्या घराचं बांधकाम आहे. माने यांनी या भूखंडाबाबत कायदेशीर पुरावे सादर करावेत असं त्यांना कळवण्यात आलं आहे. तसं पालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या वॉर्ड आफिसरचं पत्र आहे. स्वत: नगरसेवकही मान्य करतात की त्यांच्या घराचं बांधकाम बेकायदेशीर आहे.मुंबई महापालिकेच्या अधिनियमानुसार कोणत्याही नगरसेवकाने, मुंबईत अनधिकृत बांधकाम केलं असेल. तर त्याचं नगरसेवकपद रद्द करण्यात येतं. नरेश माने यांचं ऑफिस आणि त्यांचं राहतं घर हे दोन्ही अनधिकृत आहेत. आणि तरी देखील मुंबई महापालिकेनं नरेश मानेंवर कोणतीच कारवाई केलेली नाही. महापालिकेचे स्थानिक अधिकारी मात्र यावर बोलायला तयार नाही. धारावीतले शिवसेनेचे कार्यकर्ते रवींद्र कोडम, यांनी माने यांच्या अनधिकृत बांधकामाची मुंबई महानगरपालिकेत तक्रार केली आहे. पण त्यांना सांगण्यात आलं की 1984मध्ये त्यांनी ही जागा विकत घेतली. असं असेल तर त्यांनी जागा नावावर का करून घेतली नाही. आणि त्यांचं ते भाडं का भरत नाही.जाणकारांच्या मते या अनधिकृत बांधकामाबाबत नरेश माने यांचं नगरसेवक पद रद्द होऊ शकतं.मुंबईत अनधिकृत बांधकाम करणं हा एक मोठा धंदा आहे. जिथं एका स्क्वेअर फूटला 10,000 रुपयापेक्षा जास्त भाव आहे तिथं तर मोठ्या प्रमाणावर बांधकांम चालतं. आता सवाल उरतो नरेश माने सारख्या नगरसेवकांवर कारवाई होईल का? जर झाली तर बाकीच्यांनाही आळा बसेल.

close