तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण

July 15, 2013 9:08 PM0 commentsViews: 178

15 जुलै : माळीनगरमध्ये आज तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण रंगलं. तर कुडूस फाट्याला माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. दुपारच्या विसाव्यानंतर माऊलींच्या पालखीत वेळापूरजवळ धावा पार पडला. धाव्यानंतर माऊलींची पालखी वेळापूरमध्ये मुक्कामी विसावलीये.

close