‘रोहयो’त भ्रष्टाचारामुळे 4 मजुरांची आत्महत्या

July 15, 2013 9:15 PM1 commentViews: 226

15 जुलै : रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारामुळे विदर्भातल्या 3 आणि मराठवाड्यातल्या एका मजुरानं आत्महत्या केली. या योजनेतल्या भ्रष्टाचारामुळे इथल्या बर्‍याच मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास अकराशेहून अधिक मजुरांच्या नावानं खोटं खातं पोस्ट ऑफिसमध्ये उघडून या मजुरांचे करोडो रुपये खात्यातूनच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. असाच प्रकार राज्यातल्या इतर भागातही झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियननं केला आहे. गेल्या 2 वर्षांपासून हे मजूर शासन दरबारी लढा देत आहे पण अजूनही त्यांना पैसे न मिळाल्यानं काहींनी आत्महत्येचा मार्ग पत्कारला.

  • Ramesh Tupsaindar

    redicoulous……………. shame in democracy…………..

close