‘नक्षली भागात जिल्हा विकास प्राधिकरण स्थापणार’

July 15, 2013 9:19 PM0 commentsViews: 54

Image img_238492_cmpruthavirajchavhan_240x180.jpg15 जुलै : राज्यातल्या नक्षली भागात जिल्हा विकास प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. गोंदिया आणि गडचिरोलीत जिल्हा विकास प्राधिकरण स्थापणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नक्षली भागातल्या विकासासाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. या दोन्ही जिल्ह्यात असलेलं नक्षलवादाचं सावट आणि त्यामुळे विकास कामांना बसलेला फटका पाहता एप्रिल 2013 मध्ये विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती.

close