नोकरीचं आमिष दाखवून तरुणाकडून 20 हजार उकळले

July 15, 2013 9:41 PM0 commentsViews: 363

15 जुलै : प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून तरूणांची फसवणूक करणारी टोळी पुण्यात सक्रीय असल्याचं उघडकीला आलाय. क्विकर या वेबसाईटवर नोकरी शोधणार्‍या कॉम्प्युटर इंजिनीअर्सची या टोळीकडून फसवणूक करण्यात आलीय. रवीकिरण लोखंडे या इंजिनीअरनं साईटवर दिलेल्या एका मोबाईलवर फोन केला. यावेळी ऑफर लेटर मिळाल्यावर 60 हजार रुपये भरावे लागतील असं सांगण्यातही आलं. विशेष म्हणजे एका कंपनीचं ऑफर लेटरही रवीकिरणला पाठवण्यात आलं. तसंच त्यानं अमितकूमार दुबे या व्यक्तीच्या खात्यात 20 हजार रुपये भरले. पण प्रत्यक्षात जेव्हा तो कामावर रुजू होण्यासाठी त्या कंपनीत गेला, तेव्हा असं कुठलंही ऑफर लेटर आपण पाठवलं नसल्याचं त्याला सांगण्यात आलं. या प्रकरणाची रवीकिरणनं सायबर सेलकडे तक्रार दाखल केली.

close