बेळगाव महापालिकेवर भगवा फडकणार ?

January 21, 2009 2:59 PM0 commentsViews: 6

21 जानेवारी, बेळगाव बेळगाव महानगरपालीकेच्या नवीन इमारतीवर भगवा ध्वज लावणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठी नगरसेवकांतून संताप व्यक्त होत आहे. या इमारतीचं 23 जानेवरीला उदघाटन होणार आहे. मराठी भाषिकांचा विरोध डावलून कर्नाटक सरकार घाईघाईत या इमारतीचं उदघाटन करु शकतं. महापालिकेतील सत्तारूढ गट जुन्या इमारतीप्रमाणे नव्या इमारतीवर देखील भगवा ध्वज लावण्यात येईल असं सांगत आहेत, पण कन्नड संघटना आणि भाजप सरकारनं याला तीव्र विरोध दर्शवला आहे. मराठी नगरसेवकांनी हा डाव कोणत्याही परिस्थीतीत हाणून पाडू, असा निश्चय केला आहे." नवीन इमारतीचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. शासन घाई गडबडीनं पोलीसांच्या दडप शाहीपद्धतीनं नवीन इमारतीचं उदघाटन करणार असल्याचा प्रस्ताव आहे. पण जो पर्यंत भगवा ध्वज लावणार नाही, तो पर्यंत या इमारतीचं उदघाटन होऊ देणार नाही." असा संकल्प धनराज गवळी, या मराठी नगरसेवकानं बोलून दाखवला."भगवा जरी हिंदूंचं प्रतिक असला तरी समस्त सीमा भागातल्या आंदोलनाचं प्रतीक आहे. नवीन इमारत सुरू करतेवेळी भगवा ध्वज लावला जाईल. कन्नड रक्षण वेदिका आणि कर्नाटक सरकार भगवा लावण्याच्या विरोधात आहे. पण आम्ही निश्चितच भगवा लाऊ" असं आश्वासन सत्तरूढ गटनेते संभाजी पाटील यांनी दिलं.

close