सालेमचा प्रत्यार्पण रद्द करण्याचा खटाटोप

July 15, 2013 8:46 PM0 commentsViews: 261

Image img_191592_abusalem_240x180.jpg15 जुलै : आपलं प्रत्यार्पण रद्द करण्यात यावं यासाठी गँगस्टर अबू सालेम पोर्तुगाल कोर्टात अर्ज करणार आहे. अबू सालेमला 2005 साली पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आलं. सालेम याच्याविरोधात आठ गुन्ह्यांची नोंद आहे. यापैकी तीन गुन्ह्यांबाबत मुंबईतील वेगवेगळ्या कोर्टात सुनावणी सुरु आहे.

अबू सालेम सध्या तुरुंगात आहे. पण तुरुंगात त्याच्यावर दोनवेळा जीवघेणे हल्ले झालेत. पोर्तुगालमधून भारतात आणताना सालेमला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार नाही, त्याचप्रमाणे त्याच्या जिवीताचं संरक्षण केलं जाईल या दोन गोष्टींची खात्री दिली गेली होती. पण आपल्यावर दोनवेळा हल्ले झाले आहेत.

त्यामुळे आपण आता इथं सुरक्षित नाही. असं अबू सालेमचं म्हणणं आहे. सालेमचे पोर्तुगालमधील वकिल सॅम्युअल फरेरा हे मुंबईत आले आहेत. त्यांनी टाडा कोर्टाच्या परवानगीनं सालेम याची भेट घेतली. आणि दोन तास चर्चा केली.

close