‘सतीश शेट्टी हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा’

July 15, 2013 11:05 PM0 commentsViews: 276

Image img_73322_satishs_240x180.jpg15 जुलै : तळेगाव मधील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. सतीश शेट्टी यांच्या तक्रारीवरुन पुणे पोलिसांनी बेकायदेशीरपणे व्यवहार करुन जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी सीबीआयनं मुंबई हायकोर्टात केली आहे.

 

मुंबई हायकोर्टाने जर सीबीआयची मागणी मान्य केली तर सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपासाला गती येईल. बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणी आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर हेसुद्धा आरोपी आहेत. आयआरबी आणि त्यांच्या सहकंपन्यांनी सरकारी भूखंड हडपण्यासाठी बनावट कागदपत्रं तयार केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता. शेट्टी यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहून भूखंड घोटाळ्याची तक्रार दाखल केली होती.

close