राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार

July 16, 2013 3:19 PM5 commentsViews: 1103

dance baar16 जुलै : मंद डिस्को लाईट…थरकायला लावणारं संगीत…आणि त्यावर ताल धरणार्‍या बारबाला…ही नाईटलाईफ पुन्हा एकदा सुरू होणार आहे.महाराष्ट्र सरकारचा अतिशय वादग्रस्त ठरलेला डान्सबार बंदीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केलाय. त्यामुळे आता मुंबईसह राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई हायकोर्टाचा डान्सबारवरची बंदी उठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय. महाराष्ट्र सरकारनं ऑगस्ट 2005 मध्ये डान्सबार बंद केले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे डान्स बार मालकांनी आणि बारबालांच्या संघटनांनी स्वागत केलंय. बेरोजगार झालेल्या 75 हजार बारगर्ल्स आणि एकूण दीड लाख लोकांना पुन्हा रोजगार मिळेल असं या संघटनांनी म्हटलंय.

मुंबईत तब्बल 700 तर उर्वरीत महाराष्ट्रात एकूण 650 डान्सबार होते. ऑगस्ट 2005 मध्ये महाराष्ट्र सरकारने डान्सबार बंदीचा आदेश काढला. आणि जवळपास 75 हजार बारबाला काम बेकार झाल्या. या आदेशाला डान्सबार मालकांनी हायकोर्टात आव्हान दिलं. हायकोर्टानं बंदी उठवली. आता सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलंय. डान्सबार मालक, बारबालांच्या संघटना आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याचं स्वागत केलंय.

पण राज्यात डान्सबार नकोतच या भूमिकेवर सरकारवर ठाम आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करुन फेरविचार याचिकेचा निर्णय घेऊ, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे लाखोंना रोजगार मिळणार की डान्सबारच्या नावाखाली शोषण होणार हा प्रश्न कायम आहे. पण या निर्णयामुळे डान्सबारमधली छमछम पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे.

 • prakash kanse

  rajy sarkarne bar balala rojgaar dayva

 • rahul kirtikar

  kay chaly aaba

 • rahul kirtikar

  aaba ha tumcha prabhv aani congerscha vijay?

 • greenfab11

  DANCE BAR CONCEPT IS NOT WRONG…IN DUBAI ALL DANCE BARS ARE LEGAL WITH EACH BAR HAS ONE POLICE WHO MAKE SURE NOTHING WRONG GOING INSIDE AND MAKE SURE IT WILL CLOSE ON TIME AND IT CREATES REVENUE FOR GOVT AND ONLY MONEY FOR DRINKING WINE OR BEAR TAKEN AND NO ANY MONEY SPREADING ON GIRLS ALLOWED…

 • raj

  bakichya sarva channelwar tar ekangi charcha chaluch hotya parantu
  aaplya channelvar hi ekangi charchach hoti. Dance bar chya vysanamule
  badgit vyakti ani pariwaranchihi charcha vyala havi hoti.asyanchya
  pratinidhinahi aapan bolvayla pahije hote. Krupaya tya manjitsingh athva
  varsha kalenchya barobar ashya vayktinahi chrachet bolva mhanje doosari
  baju hi aaplyala,vakilana va nyayalayala samzel. 100000 lokanchya
  rozgarasathi 10,00000 kutumbe rastyawar aleli ahet.kityek mata bhagini
  vayovrudhanchya hatya zalelya ahet. ani hi sarva madhyamvargiy kutumbe
  ahet. kalyan dombivali panvelchya aspascha bhag hi nishani ahe. shetkari
  jamini vikun paise udhalat ahet.teva yahi goshti lakshat ghya.

close