‘कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करून निर्णय घेऊ’

July 16, 2013 3:50 PM0 commentsViews: 574

Image img_209872_rrpatil_240x180.jpg16 जुलै :  सुप्रीम कोर्टाने आज डान्स बार वरील बंदी उठवलीय. कोर्टाचा निर्णयामुळे राज्य सरकारला एकच धक्का बसलाय. कोर्टाच्या निर्णायाचा कायदेशीर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केलं. आर आर पाटलांनी या संदर्भात विधान परिषदेत निवेदन सादर केलं.

या निर्णयावर दोन्ही सभागृहातील वरिष्ठ सभासद विचारविनिमय करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात सरकार भूमिका जाहीर करेल अशी घोषणाही आर आर पाटील यांनी केली. विशेष म्हणजे डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय आर आर पाटील 2005 साली गृहमंत्री असतानाच घेण्यात आला होता. हा निकाल आल्यानंतर सरकार विरुद्ध विरोधक असं चित्र पुन्हा निर्माण झालं. ही केस कोर्टात लढवण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

close