अलविदामधून दिली शिबानीने शहिदांना श्रध्दांजली

January 21, 2009 6:16 PM0 commentsViews: 1

21 जानेवारी मुंबईअमृता पांजा मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध अनेक कलाकारांनी आपापल्या परीनं केला आहे. शिबानी कश्यपनं आपला नवा ट्रॅक आणला आहे. अलविदा. दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना तिनं हा अल्बम अर्पण केला आहे. अलविदा हा अल्बम 26 नोव्हेंबरला शहीद झालेल्यांना श्रध्दांजली देण्यासाठी शिबानी कश्यपने तयार केला आहे. या अल्बममधल्या गाण्यांचं शूटिंग नुकतंच मुंबईत झालं. तिच्या गाण्यातून अतिरेक्यांबद्दल रागच नाही, तर शहिदांसाठीचं दु:खही व्यक्त होतं.26/11च्या अतिरेकी हल्ल्यामुऴे लोकांच्या मनात राग आणि भीतीचं वातावरणं आहे. मात्र वेदना कुणालाच शेअर करता आल्या नाहीत. या वेदना शेअर कऱण्याचं काम हे गाणं करतं असं गायिका शिबानी कश्यप म्हणणं आहे. या म्युझिक व्हिडिओबद्दल शिबानीच्या मित्रांना कौतुक आहे. या ट्रॅकमुळे आपण दहशतवादाविरोधात एक व्हायला हवं, ही भावना जागरुक होते, असं त्यांचं म्हणणं आहे. दहशतवादाचा फक्त निषेध करण्यापेक्षा शिबानीचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

close