तिसरं गोल रिंगण

July 16, 2013 6:19 PM0 commentsViews: 236

16 जुलै : माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज सकाळी वेळापूर इथून भंडीशेगावच्या मुक्कामासाठी प्रस्थान ठेवलं. दरम्यान, ठाकूरबुवाची समाधी इथं सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण पार पडलं. आज दुपारी चारच्या सुमारास सोपानकाका आणि माऊलींची बंधूभेट होणार आहे. तर तिकडे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं बोरगावहून पीराची उरोली याठिकाणी मुक्कामासाठी प्रस्थान ठेवलं. त्यापूर्वी तोंडले-बोंडले इथं तुकोबारायांच्या पालखीतला धावा झाला.

close