इशरतच्या अतिरेकी संबंधावर शिंदेंचं मौन

July 16, 2013 6:39 PM1 commentViews: 653

shinde on isharat16 जुलै : गुजरातमध्ये बनावट चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँचा अतिरेक्यांशी काही संबंध होता का याबाबत गोंधळ कायम आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या एफबीआयने अतिरेकी डेविड कोलमन हेडलीचा चौकशी अहवाल एनआयएला दिला होता.

पण, हा गुप्त करार असल्यानं त्याबाबत आपण अधिक माहिती देऊ शकत नाही, असं केंद्रीय गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे एनआयएच्या अहवालात इशरतच्या नावाचा उल्लेख नसल्याचं माजी गृह सचिव जी के पिल्लई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पिल्लई यांनी 2011 मध्ये सीएनएन आयबीएनला दिलेल्या प्रतिक्रियेत या प्रकरणातल्या सर्व व्यक्ती संशयास्पद कामात असाव्यात असं म्हटलं होतं. गृह  मंत्रालयाची एक गुप्त नोंद सीएनएन आयबीएनच्या हाती लागलीयं. या नोंदीनुसार इशरत जहाँ हे लष्कर ए तोयब्बाचा कमांडर मुझम्मिलचं एक फसलेलं मॉड्यूल होतं.

याप्रकरणी आता नव्यानं जी माहिती समोर आलीय. त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत
– इशरत जहाँ प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट माहिती द्यायला नको का?
– गुजरात कोर्टात सादर केलेले दोन प्रतिज्ञापत्र परस्पर विरोधी का होते, याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला नको का?
– केंद्र सरकार इशरत प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतंय का?

  • Rameshwar

    sagle kon motha dharmnirpesh aahe ya ress madhe aahe tyat mediya pan aahe………………….KOn Jinknar Te kal Tharvel ……

close